नागपूर: स्नेलन चार्टद्वारे शाळेतच होणार मुलांची दृष्टीदोष तपासणी | पुढारी

नागपूर: स्नेलन चार्टद्वारे शाळेतच होणार मुलांची दृष्टीदोष तपासणी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : मुलांच्या दृष्टीदोषाचे लवकर निदान व त्यावरील योग्य उपचार झाल्यास त्यांचा दृष्टीदोष वेळीच दूर होण्यास मदत होईल. आजारावर उपचार करणे सोपे होईल व त्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुलांची दृष्टीदोष तपासणी स्नेलन चार्टद्वारे करण्यात येणार आहे. यादृष्टीने सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत स्नेलन चार्टची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्याची वैद्यकिय तपासणी RBSKTeamद्वारे नियमित केली जाते, यात सर्व मुलांची डोळयाची तपासणीचा सुध्दा समावेश आहे. तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष आढळून येतात. त्यामुळे मुलांची शाळेतच प्राथमिक स्वरुपाची तपासणी होणे गरजेचे आहे.

यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक शाळेमध्ये एक नोडल शिक्षकाची नेमणूक करुन संबंधित शाळेतील शिक्षकाने स्नेलन चार्ट (Snellen Chart) द्वारे विद्यार्थ्यांची वेळोवेळी डोळ्यांची चाचणी करुन घेतल्यास दृष्टीदोष आहे किंवा नाही, याबाबत प्राथमिक माहिती मिळू शकेल. त्याप्रमाणे हे तिन्ही चार्ट एका उजेड असलेल्या रुममध्ये लावून ६ फूट अंतराने त्याचे वाचन करुन त्यांच्या नोंदी ठेवण्यात याव्यात, याबाबतचा अहवाल संबंधित RBSK Team ला कळविण्यात यावा. स्नेलन चार्ट चाचणी वापरा बाबतचा व्हिडीओ तज्ञांद्वारे तयार करण्यात आलेला असून तो अवलोकनार्थ जि.प. वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

याबाबत प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांमध्ये स्नेलन चार्ट लावण्यात आलेले आहेत. व तपासणीची सुरुवात झाली असल्याबाबतची शहानिशा करावी. व शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना कळवावे, अशा सूचना शर्मा यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button