अनेकांना मी गृहमंत्री नकोय; परंतु कायद्यानेच राज्य चालेल : देवेंद्र फडणवीस | पुढारी

अनेकांना मी गृहमंत्री नकोय; परंतु कायद्यानेच राज्य चालेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  झेपत नसेल तर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका नुकतीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सडेतोड उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, मला याची कल्पना आहे की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली. अनेकांना मनातून असे वाटतेय की, मी गृहमंत्री नाही राहिलो तर बरे होईल; मात्र जे लोक चुकीचे काम करतील, त्यांच्यावर 100 टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. मीच गृहमंत्री राहणार आहे. खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात सखोल तपास केला जाईल. ज्याने कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कारवाई नक्कीच होईल. महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणाला धमकी दिली, तरी सरकार आणि पोलिस प्रशासन शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.

Back to top button