भंडारा: खरबी येथे खून झालेल्या महिलेची ओळख पटेना

भंडारा: खरबी येथे खून झालेल्या महिलेची ओळख पटेना

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : अत्यंत निर्दयतेने खून करुन राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील स्मशानभूमीत पोत्यात भरुन टाकलेल्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला हलविण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी सीसीटीव्ही आणि अन्य माध्यमातून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी या गावातील स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून फेकून दिल्याचे उघडकीस आले होते. त्या महिलेला पोत्यामध्ये साडीने बांधलेले होते. तसेच तिचे शरीर अर्धनग्न होते. महिलेची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. तर तिचे केस जाळण्यात आले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर महिलेचा मृतदेह भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. परंतु, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मृतदेह नागपूरला हलविण्यात आला आहे.

परंतु, सदर महिलेची ओळख अद्यापही पटू शकली नसल्याने तपास करण्यात पोलिसांनाही अडचण येत आहे. एकदा ओळख पटली की, तपासाची दिशा ठरेल, असे अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले. तसेच टोलनाक्यावरील फुटेज, ठिकठिकाणावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जात आहे. शोधपत्रिका जारी करुन ते विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याचे कातकडे म्हणाले.

हातावर 'सपना' नाव गोंदलेले

सदर महिलेची ओळख अद्यापही पटली नसली, तरी तिच्या हातावर 'सपना' हे नाव गोंदलेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या महिलेचे नाव सपना की अन्य काही, याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news