चंद्रपूर: भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर: भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वरोरा वणी मार्गावर वरोरा शहराजवळ वणीकडे जात असलेल्या एका कारला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (दि. 22) दुपारी 3 च्या सुमारास वरोरा शहराजवळ घडली. डॉ. अतुल गौरकार व अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) असे मृत पती पत्नी नाव आहे.

आज दुपारी डॉक्टर दाम्पत्य बाळाला घरी ठेऊन वरोरा येथे आले होते. दुपारी कारने (एमएच 34 ए एम 4240) वरोरा येथून वणीकडे निघाले असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (एमएच 34- बिझेड 2996) कारला जोराची धडक दिली. यावेळी डॉ. अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. अतुल गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत डॉ. अतुल यांना चंद्रपूरला रुग्णालयात नेले. दरम्यान, भद्रावतीजवळ वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. अश्विनी गौरकार या वणी येथे पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. तर डॉ. अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

हेही वाचा 

Back to top button