भंडारा: वीज पडून पाच शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

भंडारा: वीज पडून पाच शेळ्यांचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील इंदिरा सागर प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या कुर्झा गावाच्या शेतशिवारात अचानक वीज कोसळल्याने पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन शेळ्या जखमी झाल्या. यात गुराखीही गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी सायंकाच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू झाला. कुर्झा शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता. अचानक या कळपावरच वीज कोसळली. यामध्ये अजय मानकर, नागो मानकर, संजय मानकर, सुरेश मारबते यांच्या ५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर २ शेळ्या जखमी झाल्या.

तर तिथे उपस्थित असलेले प्रमिला नागो मानकर (वय ६५) व शिवानी संजय मानकर (वय १४) हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तत्काळ पवनी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सरपंच पंकज रघुते पोलीस पाटील टीकाराम कावळे, तलाठी खान यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा 

Back to top button