दिव्यांगांसाठी ९० हजार चौरस फूट जागेवर अनुभूती पार्क; नितीन गडकरींकडून भूमिपूजन | पुढारी

दिव्यांगांसाठी ९० हजार चौरस फूट जागेवर अनुभूती पार्क; नितीन गडकरींकडून भूमिपूजन

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा पूर्व नागपूर येथील पारडी परिसरात 90 हजार चौरस फुट जागेवर दिव्यांगांसाठी अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क बनवला जात आहे. 12 कोटी रुपये खर्चून तयार होणारा या प्रकारचा हा पहिलाच पार्क असणार आहे. या पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या पार्कचा उपयोग दिव्यांगांसोबतच सर्वसामान्य व्यक्ती, जेष्ठ नागरिक करू शकणार आहेत.
2016 साली केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारासाठी दिव्यांग अधिकार अधिनियम पारित केला. याच कायद्यांतर्गत दिव्यांगांना सामान्यासारखे जगण्याचा, सर्व सुविधांचा लाभ घेण्याचा अधिकार देण्यात आला. या धोरणात दक्षिण भारत आणि मध्य प्रदेशात काही दिव्यांग पार्कची निर्मिती करण्यात आली. आता नागपुरात हा पार्क साकारत आहे.

जगात हा सर्वात मोठा दिव्यांगांसाठीचा पार्क असेल अशी घोषणा या निमित्ताने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पार्कमध्ये दिव्यांगांसाठी 21 प्रकारच्या सुविधा असून टच अँड स्मेल गार्डन, हायड्रोथेरपी युनिट,वॉटर थेरपी अशा विविध सुविधांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वस्पर्शी धोरणानुसार हा पार्क विकसित केला जाणार असून त्याचे नामकरण अनुभूती दिव्यांग पार्क असे करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button