वाशिम: समृद्धी मार्गावर खासगी बस उलटून १४ प्रवाशी जखमी | पुढारी

वाशिम: समृद्धी मार्गावर खासगी बस उलटून १४ प्रवाशी जखमी

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: खासगी बसचा मागील टायर फुटून बस पलटी झाली. या अपघातात १४ प्रवाशी जखमी झाले. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज (दि. १९) वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील दोनदनजीक घडली. गंभीर जखमींना अकोला येथे रुग्णालयात दाखल केले आहे.

ही खासगी बस नागपूरवरून मुंबईला जात होती. या बसमधून ३० जण प्रवास करत होते. यापैकी १४ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा 

Back to top button