

वाशिम : पुढारी वृत्तसेवा सुभाष चौक परिसरात असलेल्या सराफा लाईन मधील HDFC या बँकेचे ATM फोडताना दोन चोरट्यांना आज (मंगळवार) रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर घटनेत आरोपी विशाल गजानन कदम (वय २५) व प्रशांत मुकुंदराव कदम (वय २६) दोघेही रा. निमजगा वाशिम या चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले. सराफा लाईनचे चौकिदार प्रमोद उकळकर व पोलीस कर्मचारी प्रदिप बोडखे यांनी चोरट्यांना रंगेहात अटक केली.
हेही वाचा :