नागपूर भेटीनंतर गृहमंत्री अमित शहा पुण्याकडे रवाना | पुढारी

नागपूर भेटीनंतर गृहमंत्री अमित शहा पुण्याकडे रवाना

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांच्या भेटीनंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे आज (दि.१८) नागपूरहून विशेष विमानाने पुण्याकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत पुण्याकडे रवाना झाले.

विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृहमंत्र्यांना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर निरोप दिला. शुक्रवारी रात्री शहा यांचे नागपूर शहरात आगमन झाले. आगमनानंतर त्यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध ‘लाईट अँड फाऊंटेन शो’ चा आनंद घेतला.

शनिवारी त्यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर रेशीम बागेतील स्मृती भवनासही त्यांनी भेट दिली. आज दुपारी त्यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने पुण्याकडे प्रयाण झाले.

हेही वाचा 

Back to top button