चंद्रपूर : विद्युत शॉक लागून वाघाचा मृत्यू? नांदगावातील घटना | पुढारी

चंद्रपूर : विद्युत शॉक लागून वाघाचा मृत्यू? नांदगावातील घटना

चंद्रपूर -पुढारी वृत्तसेवा : पोंभूर्णा वन परिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात आज सोमवारी एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. वाघाचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाल्याची चर्चा आहे. वन विभागाने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

पोंभूर्णा वनक्षेत्र अंतर्गत व मूल तालुक्यातील नांदगाव शेतशिवारात आज सोमवारी सकाळी वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली. नांदगाव येथील पुनाजी नागमकार यांच्या शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला. वनाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनस्थळी येऊन शहनिशा केली. वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र या वृत्ताला वनविभागाने दुजोरा दिला नाही.

वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार यांनी घटनास्थळी भेट घटनेची पाहणी केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.

Back to top button