वर्धा : अपार्टमेंटच्या खोलीत बनावट दारू निर्मितीचा कारखाना | पुढारी

वर्धा : अपार्टमेंटच्या खोलीत बनावट दारू निर्मितीचा कारखाना

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : एका अपार्टमेंटच्या खोलीत चक्क बनावट दारुचा कारखाना बनवला असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी छापा टाकून बनावट दारुसह साहित्य जप्त केले. क्राईम इंटेलिजन्स पथकाने शनिवारी (दि.२८) ही कारवाई केली. पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

२८ जानेवारी रोजी क्राईम इंटेलिजन्स पथकाने सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंतामणी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तपासणी केली. त्यावेळी या अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला बनावट दारूचा कारखानाच पोलिसांना सापडला. वेगवेगळ्या कंपन्यांची लेबल असलेल्या शिशांमध्ये बनावट दारू भरली जायची. लेबल, सील, शिशा द्रव्य याशिवाय इतरही साहित्य पोलिसांनी जप्त केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, अभीषेक नाईक, मंगेश आदे यांनी केली. यावेळी सावंगी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक उपस्थित होते. एका फ्लॅटमध्ये बनावट दारू तयार करत दुसर्‍या फ्लॅटमध्ये बॅगेत भरून पार्सल करत होते, असे पोलीसांच्या निदर्शनास आले. पोलीसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button