अमरावती : दुचाकींच्या धडकेत १ ठार; २ जखमी | पुढारी

अमरावती : दुचाकींच्या धडकेत १ ठार; २ जखमी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : दुचाकींच्या झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोन जण गंभीर झाले. दर्यापूर – भातकुली रस्त्यावरील टी. पाईंटजवळ हा अपघात रविवारी झाला. प्रविण उर्फ राहुल प्रेमदास खंडारे (वय ४१, रा. गौरखेडा, ता. दर्यापूर) असे मॄत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दर्यापूर येथून प्रविण खंडारे दुचाकीवरून (एम.एच २७ बी.एन १५६५) गौरखेडा गावी जात होते. त्याचवेळी शहरातील पंजाबराव कॉलनी येथील गजानन महादेव गणोदे (वय ५४) व त्यांचा मुलगा ऋणमोचन यात्रेस जात होते. दरम्यान, अमरावती – भातकुली टी.पाईंट जवळ बेगडे यांच्या पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात प्रविण खंडारे यांची दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. यात प्रवीण यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील गजानन गणोदे व मुलगा जयेश गणोदे हे दोघेही जखमी झाले. दरम्यान, गजानन गाणोदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जयेश यास किरकोळ दुखापत झाली आहे. दर्यापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button