वाशिम : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बाईक रॅली | पुढारी

वाशिम : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बाईक रॅली

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : “दिशा अखंड गातात दाही नांदते, जेथे उत्कृष्ट लोकशाही, ज्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई, तेथे सुखी असणार माझी आई”, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती, त्यानिमित्त वाशीम येथील कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

तत्पूर्वी शाळेच्या प्रशस्त प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक परिवहन अधिकारी समरीन सयद, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरोज बाहेती, सहाय्यक नगर रचनाकार रश्मी हलगे, सहायक पोलीस निरिक्षक अल्का गायकवाड, निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वाती इंगळे आणि कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका ज्योती कानडे यांची उपस्थिती होती.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी व भगवे फेटे परिधान करून बाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या महिलांनी नारी शक्तीचा संदेश दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button