नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, जिल्ह्यात ४ हजार ८६१ मतदार ; आचारसंहिता लागू | पुढारी

नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, जिल्ह्यात ४ हजार ८६१ मतदार ; आचारसंहिता लागू

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत असून, वर्धा जिल्ह्यात या निवडणुकीकरिता ४ हजार ८६१ मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.

निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. ५ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे. १२ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. १३ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाणनी होईल. १६ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान होईल. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, असे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन केले.

वर्धा जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता १४ मतदान केंद्र असणार आहेत. त्यामध्ये आठ तालुका स्तरावर तर सहा ग्रामीण स्तरावर मतदान केंद्र असतील. मागील वेळी जिल्ह्यात ४,२७९ मतदार होते. यावेळी त्यामध्ये वाढ झाली आहे. यावेळी ४,८६१ मतदार असल्याचे सांगण्यात आले.

-हेही वाचा 

Back to top button