पदवीधर, शिक्षक मतदारसंघात तीस जानेवारीला निवडणूक | पुढारी

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात तीस जानेवारीला निवडणूक

नागपूर : राज्यातील नाशिक, अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघातील तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण या तीन शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून जाणार्‍या सदस्यांसाठी 30 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीची 5 जानेवारीला अधिसूचना काढण्यात येणार आहे. 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 दरम्यान मतदान होणार आहे.

Back to top button