गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कराराला उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मान्यता | पुढारी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कराराला उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मान्यता

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने रशियाच्या किरोव येथील व्याटका स्टेट विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य कराराला राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचे पत्र गोंडवाना विद्यापीठाला पाठविले आहे. हे पत्र कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांना सुपूर्द केले.

हा सामंजस्य करार समान देवाणघेवाण तत्वावर आधारित आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सामंजस्य कराराच्या तरतुदींर्गंत पहिल्या उपक्रमाचा भाग म्हणून प्राथमिक स्तरावर रशियन भाषेचा १०० तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जानेवारी २०२३ पासून सुरू होत आहे. व्याटका स्टेट विद्यापीठ रशियन भाषा शिकवेल. त्या बदल्यात गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी भाषेतील समान अभ्यासक्रम त्यांना देईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठातर्फे देण्यात आली.

हेही वाचंलत का?

Back to top button