यवतमाळ : बालविवाह कायद्याची पायमल्ली; ११ वर्षीय चिमुरडी गर्भवती

यवतमाळ : बालविवाह कायद्याची पायमल्ली; ११ वर्षीय चिमुरडी गर्भवती

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; पाच महिन्यांपूर्वी मारेगाव तालुक्यातील एका गावात ११ वर्षांच्या मुलीचा विवाह कुटुंबीयांनी लावून दिला. ती चार महिन्यांची गरोदर राहिल्यावर दवाखान्यात गेली असता हा प्रकार उघडकीस आला. आता पोलिसांनी मुलीची आई व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. (बालविवाह)

मुलीची आई व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रशासनाकडून वेळोवेळी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. तरीही समाजात आजही बालविवाह होत असल्याचे यातून निदर्शनास येते. एका महिलेने तिच्या मुलीचा विवाह १८ जुलैला लावून दिला. त्यावेळी मुलीचे वय अवघे ११ वर्षे होते. ती आता चार महिन्यांची गरोदर आहे. आईने चार महिन्यांच्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी मुलीची आई व पतीविरुद्ध भादंवि ३७६, ३७६ एबी सहकलम ४,६, पॉक्सो कलम ९, १० बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईला अटक करून तिची रवानगी यवतमाळच्या कारागृहात करण्यात आली आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news