Maharashtra Mini Olympic : जानेवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा! ३० डिसेंबरला नागपूरातून क्रीडा ज्योतीचे आयोजन | पुढारी

Maharashtra Mini Olympic : जानेवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा! ३० डिसेंबरला नागपूरातून क्रीडा ज्योतीचे आयोजन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे २ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजना निमित्त संपूर्ण राज्यात वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. ९ विभागातून क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन ३० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त नागपूर शहरातून काढण्यात येणाऱ्या क्रीडा ज्योतीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ही रॅली विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून निघून काटोल नाका, वेस्ट हायकोर्ट रोड, पोलीस कमिश्नर कार्यालय, लॉ कॉलेज, लेडीज कॉलेज, शंकर नगर, लक्ष्मी नगर, बजाज चौक, दिक्षाभूमी व अजनी याद्वारे समृध्दी मार्गाने पुणेकडे रवाना होईल, या दरम्यान ही ज्योत सात जिल्ह्यातून जाणार असून वर्धा जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धाच्या वतीने क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात येईल.

जनतेला महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत जागृती व्हावी तसेच मोबाईल क्रांतीमुळे दिवसेंदिवस क्रीडा स्पर्धाकडे विद्यार्थ्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुर व्हावा यासाठी या क्रीडा ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, तसेच शिवछत्रपती अवार्डीची बाईक रॅली, पोलीस बँड पथक सोबत राहणार आहेत.

हेही वाचा

Back to top button