६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : अभिरूप न्यायालयाच्‍या कार्यक्रमाला रसिकांची पसंती

६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : अभिरूप न्यायालयाच्‍या कार्यक्रमाला रसिकांची पसंती
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनात 'अभिरूप न्यायालय' हे काल्पनिक सत्र घेण्यात आले. यात आरोपी म्हणून जेष्ठ लेखिका शुभांगी भडभडे या होत्या. यावेळी सरकारी वकील म्हणून डॉ. रवींद्र शोभणे यांनी तर आरोपीचे वकील म्हणून प्रकाश एदलाबादकर यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश म्हणून मोहन पांडे विराजमान होते.

या अभिरूप न्यायालयात शुभांगी भडभडे यांच्या साहित्यावर आरोप करण्यात आले आहेत. तर आरोपाचे खंडन त्यांनी केले. यासाठी सरकारी वकील प्रकाश एदलाबादकर यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. डॉ. रवींद्र शोभणे यांनी सदर आरोपांबाबत युक्तिवाद करीत यशस्वीपणे परतून लावले. याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद मिळाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत न्यायाधीश मोहन पांडे यांनी शुभांगी भडभडे यांना डॉ. शोभणे यांच्या कादंबऱ्या वाचण्याची शिक्षा दिली. अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम अतिशय खुसखुशीत, विनोदी पध्दतीने संपन्न झाला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news