शेगाव येथून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, अपघातात ४ तरुण ठार | पुढारी

शेगाव येथून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, अपघातात ४ तरुण ठार

 

वाशिम; अजय ढवळे : शेगाव येथून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला. शेगाव येथून परतलेले हे तरुण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन ते रात्री घरी परतले होते. पण भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत यांचा समावेश आहे. ते पांगरीकुटे गावाचे रहिवासी आहेत.

दरम्यान, खामगावकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची कार क्रमांक एम.एच. बी बी 8262 आणि आयशर ट्रक क्रमांक एम.एच.19 सी वाय 6404 मध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात
अपघात

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी वाहनातून सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.

जखमी तरूणाला उपचारासाठी अकोला येथे आणत असताना त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत यांचा समावेश असून ते पांगरीकुटे गावाचे रहिवासी आहेत.

या घटनेने पांगरीकुटे परिसरात शोककळा पसरली आहे.

पहा व्हिडिओ : वारकरी संप्रदायाकडूनच अस्पृश्यता निवारणाची प्रेरणा

Back to top button