गडचिरोली : काँग्रेसच्या पायदळ मोर्चास प्रारंभ | पुढारी

गडचिरोली : काँग्रेसच्या पायदळ मोर्चास प्रारंभ

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी यांच्याशी निगडित समस्या, तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी (दि.१४) गडचिरोलीतून पायदळ मोर्चास सुरुवात झाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे.

आरमोरी, ब्रम्हपुरी, नागभिड, भिवापूर, उटी, उमरेड अशा विविध ठिकाणी मोर्चेकरी प्रत्येक दिवशीच्या रात्री मुक्काम करणार आहेत. या ठिकाणांहून काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार असून, २१ डिसेंबरला हा मोर्चा नागपूरच्या विधीमंडळावर धडकणार आहे. मोर्चाच्या शुभारंभाप्रसंगी माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button