यवतमाळ : आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सख्ख्या भावांची १५ लाखांची फसवणूक | पुढारी

यवतमाळ : आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सख्ख्या भावांची १५ लाखांची फसवणूक

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दोन सख्ख्या भावांची सुमारे १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनेश विठ्ठलराव इंगोले (वय ४३, रा. लाडखेड) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बापूराव चिरडे यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांना आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिषाने दिनेशने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. चिरडे यांनी मुलांना नोकरी लागेल, या अपेक्षेने अनेकदा इंगोले याला पैसे दिले. सुमारे १५ लाख रुपये दिल्यानंतरही नोकरी लागली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे चिरडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाऊन इंगोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, इंगोले याने पैसे परत देण्यासाठी बनावट चेक दिले होते. पैसे परत न मिळाल्याने अखेरीस चिरडे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश इंगोलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button