यवतमाळ : खून प्रकरणी संशयित ताब्‍यात | पुढारी

यवतमाळ : खून प्रकरणी संशयित ताब्‍यात

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा- यवतमाळ येथील पुसद तालुक्यातील हर्षी शिवारात गिट्टी खदान परिसरातील  झालेेल्‍या खून प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. गजानन मारुती मुकाडे (वय ४०) असे त्‍याचे नाव आहे. ज्ञानेश्वर भीमराव बरगे (वय ५५, रा. बरगेवाडी घोणसरा, ता. महागाव ) असे खून झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे.

यवतमाळ येथील पुसद तालुक्यातील हर्षी शिवारात गिट्टी खदान परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ज्ञानेश्वर भीमराव बरगे असे त्‍याचे  नाव असल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले.  मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा असल्याने पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला होता. शवचिकित्सेनंतर हा खूनच असल्याचे समोर आले. मृताच्या नातेवाईकाला घटनेची माहिती देऊनही त्यांनी या प्रकरणात तक्रार दिली नाही. अखेर पोफाळी पोलिसांनीच फिर्याद देऊन खुनाचा गुन्हा दाखल केला.

ज्ञानेश्वरच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसले होते. या घटनेची माहिती मिळताच, पोफाळीचे ठाणेदार राजू हाके यांनी घटनास्थळी जावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. येथील डॉक्टरांनी शवचिकित्सा करून डोक्यात शस्त्राने वार करून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीसांनी सखोल तपास करत संशयित आरोपी गजानन मारुती मुकाडे (वय ४०) याला ताब्‍यात घेतले आहे.

हेही वाचा :  

 

Back to top button