अमरावती : दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

अमरावती : दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : एका दिव्यांग तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यामुळे पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. हा प्रकार एका आशा स्वयंसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने याबाबत तक्रार दिली आहे. मंगळवारी (१५ नोव्हेंबर) आरोपीविरुद्ध वरूड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलीस आरोपी कालू उर्फ जयसिंग ओझा शिलूरकर (वय ३०, रा. मध्यप्रदेश) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवलिला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

२६ वर्षीय तरुणी दिव्यांग असून, ती मानसिकदृष्ट्याही कमकुवत आहे. ती आपल्या बहिण व जावयाकडे राहण्यासाठी आली होती. दरम्यान कामानिमित्त आलेल्या कालूने तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिचे वारंवार लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणाला काही सांगशिल, तर जिवे मारून टाकेन, अशी धमकी त्याने पीडित तरुणीला दिली.

दरम्यान, पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. गावात गरोदर माता शोधून त्यांना प्रसूती व कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याचे कार्य करणाऱ्या एका आशा स्वयंसेविकेच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्यांनी वरूड पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आशा स्वयंसेविकेची तक्रारीवरून आरोपी कालूविरुद्ध बलात्कार व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button