अमरावती : सरकारी तांदळाचा काळाबाजार; दहा लाखांचा तांदूळ जप्त | पुढारी

अमरावती : सरकारी तांदळाचा काळाबाजार; दहा लाखांचा तांदूळ जप्त

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सरकारी तांदळाचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. काळ्याबाजारात विक्रीसाठी वाहतूक करीत असलेला तांदळाचा ट्रक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने पकडला. भातकुली ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील एका जुन्या बिल्डिंगजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ट्रकसह १० लाखांचा सरकारी तांदूळ जप्त करण्यात आला.

ट्रक क्रमांक एम.एच. २७ बिएक्स ७७७० मधून शासकीय तांदळाची काळ्याबाजारात विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने भातकुलीतील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील एका जुन्या बिल्डिंगजवळ सदर ट्रक पकडला. यावेळी ट्रकमध्ये पोत्यामध्ये भरून असलेला ३० हजार किलो तांदूळ आढळून आला. तसेच जुन्या बिल्डिंगजवळ पत्र्याच्या कंम्पाउंडमध्ये २० हजार किलो तांदूळही पथकाला दिसून आला. त्यानुसार १० लाखांचा तांदूळ व ट्रक असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले.

तांदळाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी सदरचा माल हा अमोल सुरेश महल्ले (वय २६, रा. भातकुली) याचा असल्याचे सांगितले. मात्र, तांदळाबाबत त्यांच्याजवळ कुठलीही कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भातकुली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई विशेष पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नायकवाडे, निखिल गेडाम, सुरज चव्हाण, लखन कुशराज आदींनी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button