नागपूर : मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक | पुढारी

नागपूर : मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, नागपूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला आयोगाच्या सदस्या आभाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.७) आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

हिंदुत्वाच्या मुद्यावर गद्दारी करत स्थापन झालेल्या सरकारचे मंत्री महिलांबाबतीत असे चुकीचे वक्तव्य करत असतील, तर हा जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाईंच्या महाराष्ट्राचा तसाच महिलांचा घोर अपमान आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेत नाही, तोवर त्यांना नागपूर शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात डॉ. जानबा मस्के, जावेद हबीब, रमन ठवकर, सतीश इटकेलवार, वर्षा शामकुळे, नुतन रेवतकर, लक्ष्मी सावरकर, अर्चना हरडे, अब्दुल फारूकी, शैलेंद्र तिवारी, अरविंद भाजीपाले, रवि पराते, महेंद्र भांगे, प्रशांत बनकर, राजेश पाटील, राजा बेग, आशुतोष बेलेकर, पिंकी शर्मा, राकेश बोरीकर, अमोल पारपल्लीवार, देवेंद्र घरडे, सुनील लांजेवार, अनिल बोकडे, कपिल आवारी आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button