गडचिरोली : ट्रॅक्टरवर ट्रक उलटल्याने चालकाचा मृत्यू | पुढारी

गडचिरोली : ट्रॅक्टरवर ट्रक उलटल्याने चालकाचा मृत्यू

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोहप्रकल्पात गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. ही घटना आज (गुरूवार) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. मिथुन निर्मल मंडल (वय ३८) रा. बहादूरपूर, ता. चामोर्शी असे मृत चालकाचे नाव आहे.

कोनसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या वतीने लोह कारखाना उभारण्याचे काम सुरु आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक हायवा आणि ट्रॅक्टरद्वारे सुरू आहे. आज दुपारी गिट्टी घेऊन जाणारा हायवा ट्रक उभा असलेल्या ट्रॅक्टरवर उलटला. यामध्ये ट्रॅक्टरचालक मिथुन मंडल याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button