राज्यात पोलिसांच्या १८ हजार जागांची लवकरच भरती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

राज्यात पोलिसांच्या १८ हजार जागांची लवकरच भरती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लवकरच पोलीस विभागातील १८ हजार पदांसाठी जाहिरात निघणार आहे. लवकरच राज्यात पोलिसांची १८ हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी नोकरभरती संदर्भात ही महत्वाची घोषणा केली आहे. राज्यात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्या अंतर्गत, येत्या आठवड्यात पोलिसांच्या १८ हजार जागांची भरती निघणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचे कौतुक केले. सर्व विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. राज्यातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीस भरतीची जाहिरातदेखील काढण्यात येईल. या व्यतिरीक्त रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button