चंद्रपूर : स्कार्पिओ वैनगंगा नदीत कोसळली; चालकाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : स्कार्पिओ वैनगंगा नदीत कोसळली; चालकाचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आष्टी गोंडपिंपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहन थेट वैनगंगा नदीत कोसळली. यामधील वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सहाच्या सुमारास घडली.

गोंडपिपरी येथून आष्टीकडे एम एच 20 डिवी 3711 या क्रमांकाची स्कार्पिओ वाहन जात होती. भरधाव वेगात असलेले वाहन आष्टीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून थेट नदीत कोसळली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप हे वाहन कुणाचे आहे, वाहन चालक कोण याबाबतची माहिती मिळू शकली नाही. याबाबत अधिक माहितीनुसार, गाडीमध्ये चालक एकटाच होता. अपघाताची माहिती आष्टी व गोंडपीपरी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहन नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Back to top button