वाशीम: सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

वाशीम: सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशीम,पुढारी वृत्‍तसेवा : प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू घेवून जाणार्‍या कंटेनर पाेलिसांनी ताब्‍यात घेतला आहे.  चालक मुबारक अकबर (वय २६)  यालाही पाेलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

मालेगाव हद्दीत एक कंटेनर ( क्र.PB-१३-AR-९४६३ ) वाशिमकडे जात असतान पाेलिसांनी त्‍याची तपासणी केली. कंटेनरमध्ये प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू ५३६ पोत्यांमध्ये भरलेल्‍याचे निदर्शनास आले. १४ लाख ७६ हजार किंमतीचे आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळले. हा पदार्थ उपयोगात येणारा पॅराफिन नावाचे रासायनिक पदार्थ आणि कंटेनर असा एकूण ४० लाख ५६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्‍यात आला आहे.

हेही वाचा

रत्नागिरी : इतिहास संशोधक अनंत उर्फ अण्णा शिरगावकर यांचे निधन

जामखेड : धनगर समाजासाठी घरकुल योजना

कोल्हापूर: शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले: जयंत पाटील

Back to top button