भंडारा: अल्पवयीन विवाहिता गरोदर; माहेर, सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल

भंडारा: अल्पवयीन विवाहिता गरोदर; माहेर, सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: बालविवाहासह अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय व सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असताना अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकेच नव्हे तर ती ६ महिन्याची गरोदरसुद्धा आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करताना ही मुलगी १८ वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे ग्रामसेवकाच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर व सासरच्या लोकांवर लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाची वेळी मुलीचे वय १७ वर्ष ३ महिने ५ दिवस असे असताना आई वडिलांनी तिचा विवाह सडक अर्जुनी (जि. गोंदिया) येथील युवकासोबत फेब्रुवारी २०२२ रोजी लावून दिला. तसेच मुलगी सज्ञान नाही ही बाब माहेर आणि सासरकडील लोकांना माहित असतानाही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. लग्नानंतर ही मुलगी ६ महिन्याची गर्भवतीसुद्धा आहे. ग्रामसेवक नेपाल दशरथ गोटेफोडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी मुलीचे आई- वडील तसेच पती हितेश राजेश वासनिक (वय २४) व सासू, सासरे यांच्यासह इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news