नागपूर: फसवणुकीच्या दोन घटनांत ५६ लाखांचा फटका

नागपूर: फसवणुकीच्या दोन घटनांत ५६ लाखांचा फटका

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे वाहतूक व्यवसायिक प्यारे खान यांची त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या झोनल मॅनेजरने १७ लाखांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी बलराम मिहुराम चौधरी (वय ४१) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यवसायिक प्यारे जिया खान यांची अश्मी रोड कॅरिअर्स प्रा. लि. नावाने ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीतील लॉजिस्टिक ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये बलराम मिहुराम चौधरी हे वाहतूक व्यवस्थापक आहे. त्याच्याकडे नॉर्थ झोनची जबाबदारी दिली होती. बलराम मिहुराम चौधरीने कंपनीच्या नावावर बिल्टी तयार करून माल उचलून दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावावर माल वाहतूक केली. या शिवाय जास्तीचा ट्रकभाडे दर दाखवून प्रत्येक टनामागे ५० रुपये जास्तीचे आकारले. अशा प्रकारे १७ लाख ३६ हजारांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्‍यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लॉट विक्रीत ३९ लाखांची फसवणूक

नागपुरात सध्या फसवणुकीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. वाहतूक व्यवसायिकांची फसवणुकीनंतर प्लॉट विक्रीत ३९ लाखांची फसवणूक केल्याचे घटना बर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे.

बर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड न. ७१ येथे नारायण स्वामी मेटबलमी (वय ६७), नंदिनी नारायण स्वामी मेटबलमी (वय ६५), विनोदीनी नारायण स्वामी मेटबलमी (वय ६९) यांचा एक अर्धवट बांधकाम असलेला भूखंड आहे. नितीन अंबदास नखाते (वय ५१) यांनी खरेदीचा व्यवहार केला. ३९ लाख ५० हजार रूपये दिले. मात्र तीनही आरोपींनी संगनमत करीत घर रिकामे करून तर दिलेच नाही. शिवाय पैसेही परत केले नाही. नखाते यांनी याबाबत बर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्‍यानुसार त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news