चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना मंगळवारी (दि.27) ब्रम्हपुरी तालुक्यात आवळगाव शेतशिवारात घडली. धृपता श्रावण मोहूर्ले (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील धृपता श्रावण मोहुर्ले या आपल्या शेतातील काम करीत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करुन त्या महिलला जागीच ठार केले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेला जंगलाच्या बाजुला ओढत नेले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता त्या महिलेच्या चपला आढळून आल्या.

या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. या आधी सुद्धा अशा अनेक घटना आवळगाव येथे घडच्या असून गावातील जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. संबंधीत वनविगाने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Back to top button