डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा.डॉ. शरद गडाख यांची निवड

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा.डॉ. शरद गडाख यांची निवड
Published on
Updated on

अकोला: पुढारी वृत्तसेवा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली. डॉ. गडाख विद्यापीठाचे २२ वे कुलगुरू म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती कुलसचिव प्रा. डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी दिली आहे.

डॉ. शरद गडाख सध्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्य करत आहे. त्यांची कृषि विद्यापीठात ३८ वर्ष सेवा झाली आहे. या सेवेकाळात त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले. यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणली.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प, देशी गाय संशोधन, शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, बीजोत्पादन वाढविणे, एकात्मिक शेती पध्दत मॉडेल, मॉडेल व्हिलेज इ. नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच शेतकरी प्रथम आणि मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नवीन मापदंडे स्थापित झाली.

आतापर्यंत १९ वाण विकसित

त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे १९ वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत ८० संशोधन लेख, ४३ तांत्रिक लेख, १४४ विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. ते दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कृषि कार्यक्रमातून शेतक-यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांनी विकसित केलेल्या ज्वारीच्या पंचसुत्री व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे शेतक-यांना कोरडवाहू ज्वारीचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news