अमरावती: खासदार नवनीत राणा यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

अमरावती: खासदार नवनीत राणा यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती येथील लव्ह जिहादचे प्रकरण खासदार नवनीत राणा यांच्या चांगलेच अंगलटी आले आहे. मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून खासदार नवनीत राणा यांनी आमची बदनामी केली. आमच्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभित झाला आहे. अशा आरोपाची तक्रार एका तरुणाच्या वडिलांनी राजापेठ पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तसेच, शहरातील एक तरुणी 5 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी राजापेठ पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर खासदार नवनित राणा यांनी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठले आणि लव्ह जिहादचा आरोप करून, बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुस-या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे. पोलिस मुलीची माहीती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करुन राणा यांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. तसेच राजापेठ ठाणेदार मनिष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला, असा आरोपसुध्दा यावेळी खासदार राणा यांनी केला होता.

या प्रकारावरुन राजापेठ ठाण्यात वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर 24 तासातच मुलगी सापडली आणि ती एकटी होती. आपल्याला कोणीही पळवून नेले नाही. मी शैक्षणिक कामानिमीत्त स्वत: गेली होती, असे तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे खासदार राणा यांनी मुलासोबतच आमची बदनामी केली, तसेच माझ्या मुलाला पाहून घेवू, अशी धमकी दिली आहे. या प्रकारामुळे तो भयभीत झाला आहे. या प्रकरणावरून राजापेठ पोलिसांनी धमकी देणे, बदनामी केली म्‍हणून खासदार नवनित राणा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news