Kanhaiya Kumar : नितीन गडकरींविरोधातच सीबीआयचा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार | पुढारी

Kanhaiya Kumar : नितीन गडकरींविरोधातच सीबीआयचा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका येत आहे की, एखाद्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे नेते कन्हैय्या कुमार  (Kanhaiya Kumar) यांनी येथे केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.२०) नागपुरात काँग्रेसने टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.

कन्हैय्या कुमार म्‍हणाले की, मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचेच खच्चीकरण सुरू असल्याकडे कन्हैयाकुमार यांनी बोट ठेवले. “युवा है जोश में… लायेंगे इन्हे होश में”… या घोषवाक्यासह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यां रोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत, हे सर्व थांबवायचं असेल, तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, केंद्रीय एजन्सींचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी करत आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे, आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो, असे कन्हैय्या कुमार म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button