भंडारा : चुलहारडोह येथील तलाव फुटला; नागरिकांचे स्थलांतर | पुढारी

भंडारा : चुलहारडोह येथील तलाव फुटला; नागरिकांचे स्थलांतर

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर तालुक्यातील चुलहारडोह येथील जंगलातील तलाव फुटला. आज पहाटे 3 वाजता तलावाचे पाणी मौजे धनेगाव गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

गेल्या २४ तासापासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कोसळणाऱ्या पावसामुळे तुडूंब भरलेला चुलहारडोह पहाटे ३ च्या सुमारास फुटला. तलावाचे पाणी मौजे धनेगाव गावामध्ये शिरले. आतापर्यंत सुमारे 15 घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्यांच्या जेवण व औषधांची व्यवस्था करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

हेही वाचा :

Back to top button