यवतमाळ : लाच घेताना कृषी अधिकारी जाळ्यात | पुढारी

यवतमाळ : लाच घेताना कृषी अधिकारी जाळ्यात

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : बियाणे नमुने फेल करण्याची धमकी देत पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी कृषी केंद्र चालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारताना कृषी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई कळंब पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

प्रमोद बागडे (वय ५५) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. कळंब येथील एका कृषी केंद्र चालकाने कापूस बियाणे नमुने मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यासाठी कृषी अधिकारी बागडे वेळोवेळी पैशांची मागणी करीत होते. या प्रकरणी कृषी केंद्र चालकाने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यावरून सोमवारी पंचायत समिती कृषी विभागात एसीबी पथकाने सापळा रचून पंचायत समिती कृषी अधिकारी बागडे यांना १० हजाराची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button