घाटंजी : विशेष न्यायालयाकडून आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष सुटका | पुढारी

घाटंजी : विशेष न्यायालयाकडून आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील आरोपी जलील शकुर काटोठे (वय ४०) याची विशेष न्यायाधिश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लाउळकर यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

तालुक्यातील झटाळा येथील चौफुलीवर ५ फेब्रुवारी २०१६ रोजी आदिवासी महिला एसटी बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी जलील काटोठे हा गेला. त्याने सदर महिलेला बाजूला चल तुला पैसे देतो, असे आमिष दाखविले. यामुळे सदर महिला घाबरुन गेली. आदिवासी महिलेने सदर प्रकरणाची तक्रार पारवा पोलीस ठाण्यात केली. यावरुन आरोपी जलील काटोठे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर प्रकरणात चार साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध केला नसल्याने आरोपी जलील काटोठे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Back to top button