विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी | पुढारी

विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भात पावसाने थैमान घातल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. मनुष्यहानी व पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामूळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सोयाबीन, कापूस पिके पाण्यामुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ६० हजार रूपये प्रति हेक्टरी मदत करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १३ हजार २३९ हेक्टर शेत जमीन पाण्याखाली अथवा वाहून गेली असून २०१५ चा याबाबत जो शासन निर्णय आहे. त्यानुसार केवळ ३४ हजार प्रति हेक्टर मदतीची तरतूद आहे. या निर्णयाला ७ वर्षे लोटून गेल्याने यात भर घालून हेक्टरी ६० हजाराची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी येथील खासदारांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button