नागपूर : नाल्यात स्कॉर्पिओ गेली वाहून, ६ जण बुडाल्याची भीती | पुढारी

नागपूर : नाल्यात स्कॉर्पिओ गेली वाहून, ६ जण बुडाल्याची भीती

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या एका नाल्यात प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

नागपूर जिल्ह्यातील सावनेरपासून काही अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा आहे. तेथे ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गाडीत ८ प्रवासी असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी ने सांगितले. या पैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाथी लागले आहेत. नाल्याला पुर होता. पुलावरून पाणी वाहत होते मात्र तरीही चालकाने भर पाण्यातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला.

President Election : द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा : उद्धव ठाकरे

त्यावेळी आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात गाडी वाहून गेली. मध्य प्रदेशातील हा परिवार महाराष्ट्रात लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आलेला होता. परत जाताना हा अपघात घडला आहे. बचाव पथकाचे सदस्य नाल्याच्या पाण्यात उतरले असून बचाव कार्य शुरू आहे. वृत्तलिहिस्तोवर बचाव पथकाच्या हाथी तीन जणांचे मृतदेह लागल्याची माहिती आहे.

Back to top button