वाशिम : ‘अग्निपथ’ विरोधातील मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज | पुढारी

वाशिम : 'अग्निपथ' विरोधातील मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि.२०) वाशिममध्ये महाअक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यावर अचानक मोर्चात गोंधळ माजला. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. या प्रकरणी मुख्य मोर्चेकरांना ताब्यात घेण्यात आले आहे.

केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आज वाशिममध्ये या योजने विरोधात संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाअक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा चिघळला. त्यामुळे मोर्चेकरांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button