Train hit the tiger : गोंदिया : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू | पुढारी

Train hit the tiger : गोंदिया : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

गोंदिया: पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू  (train hit the tiger) झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबी गावाजवळ आज (दि.११) सकाळी उघडकीस आली. रेल्वे रुळाच्या कडेला वाघाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

(train hit the tiger) गोंदिया-नागभीड-चंद्रपूर व्हाया वडसा असा हा रेल्वे मार्ग आहे. दोन वर्षांपूर्वी याच मार्गावर वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्याआधी देखील दोन वाघ याठिकाणी मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button