गडचिरोली : नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली | पुढारी

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत मवेली-मोहुर्ली या निर्माणाधीन रस्त्याच्या बांधकाम सुरु आहे. येथील  चार वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मवेली ते मोहुर्ली या रस्त्याचे बांधकाम वल्लभभानी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत केले जात आहे. मात्र, काल मध्यरात्री सशस्त्र नक्षलवादी बांधकामस्थळी गेले. त्यांनी चौकीदाराला झोपेतून उठवून दोन पोकलेन, ट्रॅक्टर आणि ट्रकला आग लावली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button