लातूर : व्यायाम करताना भरधाव कारची धडक ; तरुण ठार, एक जखमी | पुढारी

लातूर : व्यायाम करताना भरधाव कारची धडक ; तरुण ठार, एक जखमी

किनगाव ; पुढारी वृत्तसेवा : व्यायाम करत असताना भरधाव कारची धडक बसल्‍याने एक तरुण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. लातूर तालुक्यातील दगडवाडीनजीक आज (दि.१५) सकाळी ६:३० च्या दरम्यान हा अपघात झाला. मुकुंद रामराव मुंढे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमी प्रतीक पांडुरंग मुंढे (वय २१) याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, मुकुंद याचा शुक्रवारी साखरपुडा होता. त्‍यापूर्वीच काळाने त्‍याच्‍यावर घाला घातल्‍याने परिसरात हळहळ व्‍यक्‍त हाेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुकुंद आणि प्रतीक हे दगडवाडी येथील वीटभट्टीजवळील रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. यावेळी (एमएच ४४ एस ७९७०) या क्रमांकाच्या भरधाव येणाऱ्या कारने त्‍यांना धडक दिली.मुकुंद मुंढे जागीच ठार झाला. तर प्रतीक जखमी झाला.

पोलीस नाईक नागनाथ कातळे यांच्या फिर्यादीवरून कार चालक वसीम याकूब शेख (रा. फत्तेपुरा गल्ली, अहमदपूर) याच्या विरुद्ध निष्काळजी व भरधाव कार चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button