भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्‍हा दाखल | पुढारी

भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्‍हा दाखल

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील चिंगी येथील पोलीस पाटील संजय रामकृष्ण रामटेके (वय ३५) याच्‍यावर १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे. या घटनेची तक्रार साकोली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चिंगी येथे शनिवारी रात्री बचत गटाची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान एका १३ वर्षीय मुलीला पोलीस पाटलाकडून स्टॅम्प घेऊन ये, म्हणून पाठविण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील संजय रामटेके याने   मुलीचा विनयभंग केला. मुलगी  रडत घरी आली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्या मुलीने सर्व घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन गाठले. व त्यांनी या घटनेची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी पोलीस पाटील संजय रामटेके याच्यावर कलम ३५४ अ, पोस्कोनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button