अमरावती : एसटी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत २ ठार | पुढारी

अमरावती : एसटी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत २ ठार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पुसद येथून अमरावतीकडे येणाऱ्या एसटी बस आणि ट्रकची शिंगणापूर चौफुलीवर जोरदार धडक झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर हा भीषण अपघात बुधवारी सकाळी 11 वाजणाच्या सुमारास झाला. या अपघातात 2  प्रवासी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी तर 27 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पुसद येथून एम.एच. 40 वाय 5926 क्रमांकाची बस अमरावतीकडे जात होती. दरम्‍यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर औरंगाबादकडून नागपूरकडे जाणारा भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. यावेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. बसमधील 26 प्रवाशी जखमी असून यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.

तसेच, यामधील गंभीर स्वरूपाच्या जखमींना अमरावती येथील रुग्णालयात तात्‍काळ दाखल करण्यात आले आहे. तर यातील जखमी प्रवासी प्रशिक खडसे (पाथरड गोळे), पार्वता पोहनकर (पिंपरी कलगा), मुमताज बेगम (अमरावती), अरुणा अमुने (पुसद), अनिकेत राठोड (पुसद), कुसुम पोहणकर (शिंगणापूर), प्रियंका दायमा (पुसद), वनिता खडसे (पाथरड गोळे), पंडित कंडेल (महागाव), वनिता मेश्राम (मालखेड), प्रेमदास चव्हाण (वाहक), चेतन शागानी (दारव्हा), सारिका भिडेकर (बडनेरा), अश्विन जाधव (पुसद), सिद्धार्थ धुळे (पुसद), शालिनी गुजर (नांदगाव खंडेश्वर), बाळकृष्ण काळे (शेंद्री डोलारी), विजय पत्रे (पुसद), तुषार भिडेकर (बडनेरा), नरेश शागानी (दारवा), वसंत वाहने (दिघी कोल्हे), सुरेश इंगळे (पुसद), साक्षी उंबरकर (पुसद), तर काही प्रवाशी नेर, नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील 14 प्रवासी अमरावती येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या संपूर्ण घटनेचा पंचनामा नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन कडून करण्यात आला. व पुढील तपास ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. सदा देवकते, राम ढाकणे, सचिन म सांगे, निलेश करंजीकर, प्रफुल सहारे, सतीश राठोड, हे करीत आहेत.

बसमधील प्रवासी यांनी दिलेली माहिती प्रमाणे आम्ही बसमध्ये पुसद वरून अमरावती कडे जात असताना अचानक शिंगणापूर चौफुलीवर औरंगाबाद कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक देत 50 ते 60 फूट फरफटत नेले. अचानक झालेल्या घटनांमुळे सर्व प्रवाशी हादरले. -पंडित कंडेल, प्रवाशी (महागाव जि. यवतमाळ)

Back to top button