नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शेजारी राहाणाऱ्याने आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना रविवारी घडल्याने नागपुरात खळबळ माजली आहे. इमामवाडा पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला (वय ४२) अटक केली आहे. हा आरोपी ठेल्यावर लिंबूपाणी विकतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी तुरूंगात गेला आहे. तर त्याचा मुलगाही तुरूंगात आहे.
दुपारी शेजारी खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत रडत घरी आली. तिच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग पाहून आईने त्वरित मेडिकलला नेले. तिथे तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे लक्षात आले. मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहाता पोलिसांनी आरोपीला अटक केली.