नागपूर : जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला

नागपूर : जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील सुराबर्डी येथे एक युवती पुर्णतः जळालेल्या अवस्थेत आढळली. यामूळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वीस ते पंचवीस वयोगटातील ही युवती आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हा प्रकार घातपात असल्‍याचा संशय आहे. दवलामेटी नजीक सुराबर्डी येथे म्हाडा कॉलनीचे क्‍वार्टर येथील मैदानात एका झाडाखाली एक युवतीचा मृतदेह आढळून आला. या युवतीचे संपूर्ण शरीर जळालेल्‍या अवस्थेत बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दिसून आले.

दरम्‍यान, बकऱ्या चारणाऱ्या एका व्यक्तीला जळालेल्या अवस्थेतील युवतीचे शरीर दिसले. त्‍यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सरपंचास याबाबत माहिती दिली. तसेच वाडी पोलीस ठाणे यांनाही माहिती देण्यात आली. ही घटना यूटीसी कॅम्पच्या समोर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तात्‍काळ दाखल झाले. याबाबत पोलिस अधिक तपास करत असून अद्याप युवतीची ओळख पटलेली नाही. तसेच पोलीसांनी या युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news