गडचिरोली : पत्‍नीने आत्‍महत्‍या केल्‍याचे समजताच सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्‍महत्‍या

गडचिरोली : पत्‍नीने आत्‍महत्‍या केल्‍याचे समजताच सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्‍महत्‍या
Published on
Updated on

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने स्‍वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्‍कादायक घटना आज (गुरूवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धानोरा पोलिस ठाण्यात घडली. चंद्रभूषण जगत असे मृत जवानाचे नाव आहे.

धानोरा पोलिस ठाण्याच्या आवारात केंद्रीय राखीव दलाच्या ११३ क्रमांकाच्या बटालियनचा कॅम्प आहे. तेथे चंद्रभूषण जगत हा जवान कार्यरत होता. दरम्यान सकाळी साडेसात वाजता पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषणला कळली. त्यानंतर काहीही विचार न करता त्याने स्वत:वर आपल्याकडील बंदुकीची गोळी झाडली. या नंतर तात्‍काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

चंद्रभूषण जगत हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील कुकुर्दीकेरा येथील रहिवासी असून, त्याची पत्नी गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते आणि सुट्यानंतर तो काही दिवसांपूर्वीच धानोरा येथे कर्तव्यावर रुजू झाला होता, अशी माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news